फक्त मला एकदा तरी उडू द्या
या जगाचा प्रत्येक काना कोपरा मला एकदा तरी पाहू द्या
लहानपणा पासून उडायला शिकवले
आसमानात फिरायला शिकवले
पावलोपावली प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी बरेच अनुभव सांगत आलात
मला शिकवत आलात मला या जगाने काय दिले आणि मला या जगाला काय द्यायचे आहे
त्याची आठवण करत आलात
एवढ सगळ असून सुद्धा तुम्ही
मला तुमच्या पंखा खाली का ठेवत आलात
प्रत्येक संकटात मदत करत आलात
पंखात आहे बळ
फक्त एकदाच उंच भरारी घ्यायची इच्छा आहे
आता तरी उडू द्या
या जगाला मोठ होऊन दाखवायचं आहे
फक्त मला एकदा तरी उडू द्या
या जगाचा प्रत्येक काना कोपरा मला पाहू द्या
(Created by Me)